जगभरात अभूतपूर्व आपत्ती उद्भवतात तेव्हा जीवनाचा मार्ग कसा शोधावा? वाढत्या जागतिक तापमानामुळे नैसर्गिक आपत्ती आणि रोगांचा प्रादुर्भाव होत आहे, त्यामुळे मानवाला काय करावे हे कळत नाही आणि तो त्यावर उपाययोजनाही करू शकत नाही. केवळ परमेश्वरच आपल्याला अशा आपत्तींपासून वाचण्याचा मार्ग शिकवू शकतात.
परमेश्वराने आपल्याला शिकवले आहे की अनंतकालिक जीवनाचा मार्ग एदेन बागेतील जीवनाचे झाड यातून खाणे हा आहे. ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांनी, सर्व मानवजातीवर मृत्यू आणणाऱ्या, बर्या-वाईटाचे ज्ञान करुन देणार्या झाडाचे फळ खाण्याच्या पापाची आपल्याला क्षमा केली आहे. त्यांनी आपल्याला नवीन कराराच्या वल्हांडणाचे सत्य, म्हणजेच जीवनाचे झाड याकडे जाण्याचा मार्ग शिकवला आहे. आज, जीवनाचे झाड याचे हे सत्य असलेले एकमेव चर्च म्हणजे चर्च ऑफ गॉड आहे.
मग परमेश्वर देव म्हणाला, “पाहा, मनुष्याला बरेवाईट कळू लागून तो आमच्यातल्या एकासमान झाला आहे; तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्वकाळ जिवंत राहील;” उत्पत्ती ३:२२
ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही; जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. योहान ६:५३–५४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण